पंढरपूर वारीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी

 पंढरपूर वारीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी खालील प्रमाणे :

दक्षिण भारताची काशी नावाने प्रसिद्ध असलेले पंढरपूर हे पवित्र चंद्रभागेच्या तीरावर वसलेले आहे .प्रत्येक वारीला खूप वारकरी पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात याच निमित्ताने प्रत्येक माउलींनी खालीं गोष्टीचे ध्यान राखल्यास आपली वारी हि सुखकर होण्यास मदत होईल .

१) प्रत्येक माउलींनी आपल्या दररोजची औषधे सोबत आणावीत म्हणजे कोणताही अनर्थ टाळण्यास मदत होईल.

२) वारीच्या दरम्यान कोणत्याही अनोळखी माणसांनी दिलेली खाद्य पदार्थ घेऊ नये’.

३)  वारीच्या दरम्यान प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि पोलिसांना सरकार्य करावे .

४)  वारीला  जाताना आपण कोणत्याही मौल्यवान गोष्टी शक्यतो सोबत आणू नये ,आणि जर आणल्यास त्या मौल्यवान गोष्टी जपवून ठेवाव्यात .

५) चंद्रभागे मध्ये स्नान करताना आपण आपले कपडे व इतर साहित्य जपून ठेवावे जेणेंकरून ते चोरीला जाण्यापासून वाचेल.

६) पंढरपूर मध्ये उपलब्ध असण्याऱ्या कचरा कुंडी मधेच आपण कचरा टाकावा जेणेकरून आपण आपल्या लाडक्या विठूरायाची पंढरी स्वछ ढेवण्यास मदत होईल.

७) वारीच्या काळात प्रवाशी ST  च्या वेळप्रतकातील बदलाचे निरीक्षण करावे .

८) ST  बस स्थानकावर असणाऱ्या आपल्या  अशिक्षित माउलींना त्यांची बस शोधणयास मार्गदर्शन करावे.

अश्या प्रकारच्या काही बारीक सारीक गोष्टींची काळजी घेतली तर आपला प्रवास सुखकर होण्यास मदत. होईल अश्याच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी परत नक्की एकदा भेट द्या.

Do you like it ! Share with your friends...
  • 119
    Shares
  • 119
    Shares